कन्या पुजन का करावे कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते. यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या कन्येला कल्याणी, पाच वर्षांच्या कन्येला रोहिणी, सहा वर्षाच्या कन्येला कालिका, आठ वर्षांच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा, दहा वर्षांच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते. या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात. मात्र, दहा वर्षांवरील कुमारिकांचा समावेश कन्या पूजनात करू नये. अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. नवरात्रातील सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी कुमारिका पूजन करावे. कन्या पूजनापूर्वी कुमारिकांनाचे उत्तमरित्या स्वागत करावे. यानंतर त्यांना विशिष्ट आसनावर बसवावे. हळद-कुंकू लावून अक्षतांचे प्रोक्षण करावे. कुमारिकांना खीर-पुरीचा प्रसाद द्यावा. कुमारिका पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून, आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे कुमारिका पूजन यथाशक्ती, यथासंभव करावे, असे सांगितले जात आहे.